संभाजी भिडेंचे वक्तव्य तपासून कारवाई व्हावी; जयंत पाटलांची मागणी

Jayant Patil on Sambhaji Bhide

मुंबई : कोरोनामुळे (Corona Virus) मरणारे लोक जगण्याच्या लायकीचे नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले होते. भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. भिडे यांच्या व्यक्तव्यामुळे कोरोना घालवण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत त्यावर परिणाम होईल, असे पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी रविवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पाटील म्हणाले की, “गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना कोरोनाची लागण झाली होती, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. इतकेच नाही, तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा वेळी संभाजी भिडे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वसामान्य लोक संसर्गापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. संभाजी भिडे यांचे वक्त्तव्य चुकीचे आहे. संबंधित यंत्रणेने भिडे यांचे वक्तव्य तपासावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button