पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलं. प्रामुख्याने जयंत पाटील (Jayant Patil) यांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाबाबत आणि धंनजय मुंडे अडचणीत सापडल्याने पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर विचारण्यात आलं.

त्यावर जयंत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर मी काही बोलणार नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केला आहे, त्याबाबत प्राथमिक माहिती घेऊन, आवश्यक त्या गोष्टी होतील. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

तसेच पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे? त्याबाबत काय सांगाल असं जयंत पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर जयंत पाटील यांनी “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” असं म्हणत केवळ एका ओळीत उत्तर दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER