महाराष्ट्रात राजस्थान होणे अशक्य – जयंत पाटील

चंद्रकांत पाटील यांच्या 20 जागांवरील विधानाला जयंत पाटील यांचे उत्तर

mahavikas aghadi

पंढरपूर :- राजस्थान कॉंग्रेस सरकारमध्ये सचिन पायलट(Sachin Pailat) यांच्या बंडामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. पाय़लट यांना कॉंग्रेस(Congress) नेतृत्त्वाकडून मनधरणी करण्यात आसली मात्र, तरीही पायलट यांनी बंडाची भूमिका मागे न घेतल्याने अखेर कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई करून पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आहे.

त्यानंतर लगेच माध्यमांनी पंढरपूर(Pandharpur) दौ-यावर असलेल्या जयंत पाटील(Jayant Patil) यांना महाराष्ट्राच्या स्थितीवर प्रश्न केला त्यावर महाराष्ट्रात राजस्थान(Rajasthan) होणे शक्य नसल्याचे एका वाक्यात स्पष्ट उत्तर दिले आहे.

तत्पुर्वी जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या 20 जागांच्या विधानावर व एकटे लढण्याच्या आव्हानावरसुद्धा पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ही बातमी पण वाचा : सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा : अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल ;पालकमंत्री जयंत पाटील

“भाजपाने(BJP) एकदा स्वतंत्र लढून बघाव, राज्यात त्यांना 60-65 जागावरच समाधान मानावे लागेल”, असं जयंत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढून, आपली ताकद दाखवावी असं आव्हान दिलं होतं. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. “भाजपनेही स्वतंत्र लढावं, त्यांना केवळ 60 ते 65 जागाच मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा ते जिंकू शकणार नाहीत”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच, महाराष्ट्रात(Maharashtra) राजस्थान होणे अश्कय असल्याचेही त्यांनी ठामपणे पत्रकारांना सांगितले आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज पंढरपूरमध्ये आहेत. पक्षाच्या बैठकीसाठी त्यांनी पंढरपूर दौरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER