सतत राज्यपालांकडे जाऊन त्यांना त्रास देण्यापेक्षा आम्हाला सल्ले द्या – जयंत पाटील

Devendra Fadnavis - Jayant Patil Video

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्रात वाढत असतानाच राज्यातील विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये राजकीय ठिणगी उडाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचे रुग्ण वाढण्यासाठी विद्यमान सरकार जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी ठाकरे सरकार असमर्थ असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही विरोधकांनी निशाणा साधला होता त्यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष भाजपाला सुनावले आहे.

कोविड संदर्भात उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – जयंत पाटील

पवार साहेबांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत आमच्या मित्रांनी सल्ले देऊ नये. हा काळ सर्वांनी एकत्रित येऊन लढायचा आहे. यात राजकारण आणू नये, काही लोक राजकारण करत आहे. तर, काही लोक अस्वस्थ आहेत. परंतू, दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे. आमच्याशी बोला, आम्हाला सुचवा, सतत राज्यपालांना जाऊन त्रास देऊ नका. व्यवस्थेचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नाही. इथून पुढे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सल्ला द्यावा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

शरद पवार यांनी केंद्राकडे शेतक-यांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंनाही एक पत्र लिहावं व एखाद्या पॅकेजची मागणी करावी असा टोला लगावला होता.

तसेच, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही विद्यमान ठाकरे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे.

काल भाजपाचे वरीष्ठ नेते सुब्रमण्याम स्वामी यांनी ठाकरे सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास असमर्थ असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या ट्विटनंतर राज्याच्या राजकारण्यांनीही स्वामींच्या सुरात सूर मिसळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला