सांगलीतील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची जयंत पाटलांकडून पाहणी

Jayant Patil

सांगली :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कार्वे आणि बेणापूर येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची तसेच अग्रणी नदीच्या पुरामुळे वाहून गेलेल्या रस्ताची पाहणी पालकमंत्री जयंत पाटील (Jatyant Patil) यांनी केली. खानापूर तालुक्यात एका दिवसात ढग फुटीसारखा तब्बल सव्वाशे मिलिमीटर इतका जबरदस्त पाऊस पडला.

या झालेल्या अति वृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला सोबत घेऊन आज खानापूर तालुक्यातील कार्वे आणि बेणापूर गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यातील द्राक्ष ऊस भात सोयाबीन आदी पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाई बाबत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER