लढण्याची आणि जगण्याची जिद्द असणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीचा जयंत पाटील यांच्याकडून साडीचोळी देऊन सत्कार

jayant Patil - Maharastra Today

सांगली दि. ७ जून – कोरोनाने (Corona) भल्याभल्यांना घाम फोडला मात्र इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना आजीने कोरोनाला आपल्या जवळपास फिरकू दिले नाहीच उलट लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने जगण्याशी लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोन्ही डोस पूर्ण केल्याबद्दल १०८ वर्षीय जरीना आजीचा साडीचोळी देऊन सत्कारही केला.

मंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने ‘लवकर आलास…’ अशी हाक देत मायेनं विचारपूसही केली.

इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करुन लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे दाखवून दिलं. त्यामुळे लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button