जयंत पाटील, फुकटात मिळाले ते पचवा; चंद्रकांतदादांचा टोमणा

jayant Patil & Chandrakant Patil

पुणे : जयंत पाटील, फुकटात मिळाले ते पचवा. आमची चिंता करण्याची गरज नाही. प्रखर विरोधी पक्ष म्हणून आम्ही राज्यात काम करतो आहोत, असा टोमणा म्हणत चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांना  पत्रकार परिषदेत मारला.

जयंत पाटील म्हणाले होते – हे सरकार पडेल असे  भाजपाचे नेते एक वर्षापासून म्हणत आहेत. भाजपाची आणखी चार वर्षे हेच म्हणण्यात जातील. याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी फुकटच मिळालं आहे ते आधी पचवा, असा टोमणा जयंत पाटील यांना मारला.

संजय राऊत यांनाही सुनावले
नीतीश कुमार यांनी बिहारचा पॅटर्न महाराष्ट्रातही राबवावा, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात चंद्रकांत पाटील म्हणाले – संजय राऊत यांना सल्ला देण्यासाठी दिल्लीत पाठवलं पाहिजे. खरं तर अमेरिकेतही त्यांच्या सल्ल्याची गरज होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER