सतीश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे औरंगाबादेत

Satish Chavan - Jayant Patil - Dhananjay Munde - Rajesh Tope

औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) औरंगाबाद विमानतळावर पोहोचले आहेत .

धानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी (Graduate and Teacher Legislative Council Elections) मोर्चेंबांधणीला सुरुवात झाली आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अखेरच्या दिवशी औरंगाबादमधून सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजप (BJP) आणि काँग्रेसकडून (Congress) उमेदवार जाहीर झाल्यानंतर अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नाव निश्चित करण्यात आली आहे.

औरंगाबादमधून पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत सतीश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली होती. यावेळी शिरीश बोराळकर यांनी सतीश चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपकडून बोराळकर यांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर अशी लढत पाहण्यास मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER