फडणवीस सरकारने पाच वर्षांत अधोगतीचा इतिहास रचला- जयंत पाटील

Jayant Patil-CM Fadnavis

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेला आज जुन्नर येथून सुरुवात झाली. यावेळी आयोजित सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे .

ही बातमी पण वाचा:- राज्याचा आगामी ‘मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच असेल’, अमोल कोल्हेंचा दावा

छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन गेल्या पाच वर्षांपासून भाजप -शिवसेना युती सत्तेत आहे. मात्र दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीच केले नाही . हे पाहता अधोगतीचा नवा इतिहास फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत रचला, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला .

भाजपकडून लोकांची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेकांची नावं पसरविली जात आहेत. लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम भाजपनं केलं. दुसरा पक्ष फोडून आपला पक्ष वाढविणे ही संस्कृती नव्यानं भाजपनं आणली आहे. तिला जनता स्वीकारणार नसून योग्य वेळी धडा शिकवेल. भाजपकडून वावड्या उठवण्याचं काम सुरू आहे. सत्तेवर येताना भाजपने दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्यापही पूर्ण केले नाही . राज्य सरकारतर्फे येथील बेरोजगारांची दिशाभूल करण्यात येत आहे. राज्याच्या डोक्यावरील कर्ज पाच लाख कोटींवर जाऊनदेखील महाराष्ट्रात विकास कुठेच दिसत नाही, असेही पाटील म्हणाले .