परिचारक आणि आवताडे गटाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटलांचा दावा

jayant Patil

पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, भाजपकडून यापूर्वी प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्याने परिचारक गटात नाराजी पसरल्याची माहिती पुढे आली असून, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही दुजोरा दिला.

परिचारक आणि आवताडे गटाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. जयंत पाटील यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवरून खळबळजनक दावा केला आहे. ‘पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी परिचारक अवताडे गटाची युती हे आमच्यासाठी आव्हान नाही. कारण परिचारक आणि आवताडे गटाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button