जयंत पाटील यांना धक्का : सासुरवाडी गावात भाजपची मुसंडी

Jayant Patil troll due to corona crises

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची सासुरवाडी असलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला घुळ चारत भाजपने जोरदार बाजी मारली. म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला तब्बल 15 तर राष्ट्रवादीला फक्त 2 जागांवर विजय मिळाला.

या ग्रामपंचायतीत जयंत पाटील यांचे सत्ताधारी आणि विरोधी गटातून सर्व मेहुणे-मेहुणे आणि पाहुणे उभे होते. मात्र जयंत पाटील यांचे चुलत मेहुणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने इथे मोठा विजय मिळवला. जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपचा एकतर्फी विजय झाला. म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं. भाजपाने इथे सत्ता खेचून आणली असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. जयंत पाटलांचे मेहुणे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये जयंत पाटील यांचा लहान मेहुणा, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी पराभूत झाली.

दरम्यान , सांगली जिल्ह्यात १५२ पैकी ८४ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. काँग्रेस प्रणित पॅनेलला ३७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी पॅनेलकडे १३ ग्रामपंचायती गेल्या आहेत. शिवसेना पॅनेलकडे १९ ग्रामपंचायती गेल्या आहेत. भाजपकडे ७ ग्रामपंचायती गेल्या आहेत. ७ ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER