फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही त्यांना मुंबईत चितपट करू- जयंत पाटील

Jayant Patil - Devendra Fadnavis

पुणे :- मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. भाजपा मुंबईमध्ये चितपट होणार. आतापासून सुरुवात केली तर त्यांना महत्त्व देऊ नका. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यांना आम्ही चितपट करू, असा दावा राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत उद्यापासून पुण्यातील ११ तालुक्यांतून संयुक्त प्रचार सुरू करणार असल्याचं सांगितलं. देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली म्हणून पदवीधरांसमोर मोठे संकट उभे झाले आहे. महावितरणचे ६७ हजार कोटी २०१४ नंतर फडणवीस सरकारकडून थकीत झाले आहेत. कोरोनामुळे (Corona) महाराष्ट्रावर आता संकट आलं आहे, मात्र भाजपमुळे (BJP) मंत्रालय धोक्यात आलं, अशी टीकाही जयंत पाटलांनी यावेळी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात थकबाकी कशी वाढली याचा अभ्यास करायला वेळ द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हे कशामुळे घडले यासाठी चौकशीचे आदेश दिल्याची माहितीही जयंत पाटलांनी दिली.

आम्ही लोकांना दिलासा देण्यासाठी वीज मंडळाला सक्षम केले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. थकबाकीला वेग देऊन दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार सक्षम आहे, अशी ग्वाही जयंत पाटलांनी दिली. शाळा सुरू करताना स्थानिक पातळीवर तिथली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे परत कोरोना वाढू नये. पुढील १०-१५ दिवस काळजी घेणं गरजेचं आहे. पालकांनी संभ्रमात राहू नये. स्थानिक लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. मुंबईत बसून निर्णय घेतला तरी स्थानिकांनी निर्णय घेणं महत्त्वाचे आहे. ” असं आवाहनही जयंत पाटील यांनी केलं.

कॉंग्रेसला (Congress) डावललं जातं, असा आरोप करणाऱ्या भाजपने शिवसेनेला अशीच वागणूक दिली होती. भाजपच्या विधानांकडे दुर्लक्ष करावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठलाही दुजाभाव करत नाहीत, असा दावा जयंत पाटलांनी केला.

ही बातमी पण वाचा : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना, त्यांच्या भगव्यात भेसळ – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER