उपचाराअभावी जाऊ देणार नाही : जयंत पाटील

Jayant Patil

सांगली : उपचारांअभावी एखाद्या रुग्णाचा जीव जावा, असे आता होवू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

तासगाव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन व लाईफ केअर सेंटर या हॉस्पिटलमध्ये खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्या प्रेरणेतून आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने तासगाव नगरपालिका व सर्व डॉक्टर, मेडिकल संघटना यांच्या प्रयत्नातून तासगाव कोविड – 19 केअर सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, रोहित पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, तासगाव येथे एवढ्या कमी कालावधीत उभारण्यात आलेले हे दोन्ही कोविड केअर सेंटर (Covid Care Center) नक्कीच लोकोपयोगी आहे. सध्याची परिस्थिती पाहता जास्तीत-जास्त कोविड केअर सेंटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. खासदार पाटील यांनी या हॉस्पिटलमुळे सांगली, मिरजेवर पडणारा ताण कमी होईल. तालुक्यातील डॉक्टरांनी दिलेल्या या योगदानामुळे हे हॉस्पिटल उभे राहू शकले. असे स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER