शून्याचे शंभर करण्याची आपल्यात धमक- जयंत पाटील

Jayant Patil

यवतमाळ : आपल्याकडे शून्य असेल तर त्या शून्याचे शंभर कसे होतील, याची धमक आपल्यामध्ये आहे. शरद पवार यांच्या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत केले. राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा यात्रा आज नवव्या दिवशी यवतमाळमध्ये पोहचली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली.

यावेळी ते म्हणाले की, मला रॅलींची अपेक्षा नाही. मी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून हा पक्ष मोठा करायचा आहे. जे खरे आहे ते स्वीकारले पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER