परदेशातून येणारी मदत नेमकी कुठे जात आहे, जयंत पाटील यांची केंद्राला विचारणा

Jayant Patil-Maharashtra Today

मुंबई : सध्या देशभरात कोरोनानेहाहाकार माजवला आहे. वाढत्या कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र सध्या सर्व राज्यांमध्ये दिसत आहे. यामुळेच जगभरातून भारताला मदत म्हणून वैद्यकीय सुविधांचा ओघ सुरू झाला आहे.

या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत बाहेरील देश करत आहेत. वैद्यकीय उपकरणे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा यांसारख्या गोष्टी बाहेर देशातून भारताला मिळत आहेत. यावरूनच महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे (NCP) नेते तसेच मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारला विचारणा केली आहे.

परदेशातून विमानाने मदत मिळत आहेत, असं दिसून येत आहे. पण ती मदत नेमकी कुठे जाते याची माहिती मिळत नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी ती मदत नेमकी कुठे जाते, याचा खुलासा केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button