जयंत पाटील यांनी पुन्हा दिला खाजगी डॉक्टरांना इशारा

Jayant Patil

सांगली : कोरोना (Corona) आडून कोणी सामान्य लोकांच्या जिवाशी खेळ खेळत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खासगी डॉक्टरांना आज पुन्हा दिला. यापुढे औषधांचा काळा बाजार रोखणे व रुग्णालयांच्या बीलावर नियंत्रण आणणे यावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यात ७३ ठिकाणी कोविड उपचार केंद्रे सुरु आहेत. यामध्ये ४ हजार ६२२ बेड उपलब्ध असून २ हजार ३८६ आक्सिजन तर २४८ व्हेंटिलेटर बेड आहेत. ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा सुरु आहे. आता उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. कारण बेडच आता शिल्लक आहेत. मात्र आता उपचार केलेल्या रुणांच्या दवाखान्यातील भरमसाठ बिलांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या बिलांचे आडिट करण्याठी ६ पथक नेमण्यात आल्या आहेत.

काही रुग्णालयात प्रत्यक्षात संबंधित डॉक्टरच रुग्णांवर उपचार करत नसल्याचे तर काही ठिकाणी गरज नसताना रुग्णांना अनावश्यक औषधे दिली जात असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे यापुढे औषधांचा काळा बाजार रोखणे व रुग्णालयांच्या बीलांवर नियंत्रण आणणे हे आमच्यापुढे आव्हान आहे. आता या दोन गोष्टींवरच लक्ष केंद्रीत केले जाईल. लोकांच्या जीवाशी करणाऱ्यांची गय केली नाही, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER