पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका? जयंत पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये

jayant-patil-Action mode-for-western-maharashtra-flood-situation

मुंबई :- एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट (Corona Crises) आहे. तर दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळाने राज्याच्या काही भागात थैमान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) अ‍ॅक्शन मोडमध्ये (Action Mode) आहेत. त्यामुळे त्यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेतला. संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली, याची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली.

जयंत पाटील यांनी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेतानाच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधीही बैठका घेतली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली तसेच संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : तौक्ते चक्रीवादळ ; धोका कमी झाला असला तरी मदतकार्य वेगाने सुरू ठेवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button