जयंत नारळीकर ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

jayant narlikar

९४ ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी ही माहिती दिली. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटक संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज (रविवारी) अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. ते खगोल भौतिक शास्त्रज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक आहेत. केम्ब्रिज विद्यापीठ टाटा मूलभूत संशोधन संस्था ही त्यांची कार्यसंस्था आहे (Jayant Naralikar selected as president of 94th akhil bharatiya marathi sahitya sammelan).

नारळीकर यांची गाजलेली पुस्तके :

१) अंतराळातील भस्मासुर २) अंतराळ आणि विज्ञान ३) गणितातील गमतीजमती ४) यशाची देणगी ५) चार नगरांतील माझे विश्व

मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार

१) पद्मभूषण (१९६५) २) पद्मविभूषण (२००४) ३) महाराष्ट्र भूषण (२०१०) ४) अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवन गौरव पुरस्कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER