पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत जयंत आसगावकर विजयी

Jayant Asgaonkar

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. जयंत दिनकर आसगावकर विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. आसगावकर यांना 25 हजार 985 मते मिळाली. 25 हजार 114 मतांचा कोटा होता. या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे श्री. आसगावकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, पदवीधर मतदार संघातून एकूण 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघातून 35 उमेदवार निवडणूक लढवीत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER