पुणे शिक्षक मतदार संघात जयंत आजगावकर विजयाच्या समीप

जयंत आजगावकर

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अरुण लाड (Arun Lad) यांचा दणदणीत विजय झाला आहे. शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आजगावकर (Jayant Ajgaonkar) विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. विजयाची चाहूल लागतातच मतमोजणी केंद्राबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

अंतिम निकाल येण्यापूर्वीच आसगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. अरुण लाड यांना एक लाख 22 हजार मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांना 72 हजार मतं मिळाली आहेत. लाड यांना तब्बल 49 हजार मतांची आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे, अद्याप निकालाची अधिकृत घोषणा बाकी आहे.

कोरोनामुळे (Corona) लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अरुण लाड भाजपचे (BJP) संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होईलअसे म्हटले जात होते. परंतु आतापर्यंतच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक एकतर्फी झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात होते.