जयललिता यांच्या रूपातील कंगनाचा दुसरा लूक प्रदर्शित

thalaivi-jayalalithaa

मुंबई :- बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाचा या चित्रपटातील लूक व्हायरल करण्यात आला होता. मात्र त्यावरून तिच्यावर प्रचंड टीका झाली. नेटकऱ्यांना तिचा हा लूक पसंत पडला नव्हता.

आता याच चित्रपटातील कंगनाचा आणखी एक लूक व्हायरल झाला आहे. या लूकमध्ये ती पांढऱ्या वेशात आणि कपाळावर मोठं कुंकू लावलेल्या रूपात दिसत आहे. तिचा हा फोटो हुबेहूब जयललिता यांच्या मूळ फोटोसारखाच दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी कंगनाच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

‘थलैवी’ असे या चित्रपटाचे नाव असून २६ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतम मेनन दिग्दर्शित हा चित्रपट तमीळ, तेलुगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


Web Title : The Second look of the Kangana in the form of Jayalalithaa is on display

Maharashtra Today : Latest Mumbai Bollywood News only on Maharashtra Today