पापाराझींवर भडकल्या जया बच्चन, फोटोग्राफर्सना मागावी लागली माफी

Jaya Bachchan

बॉलिवुड (Bollywood) कलाकारांचे फोटो काढण्यासाठी आणि त्यांना व्हीडियो कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर आणि व्हिडियोग्राफर त्यांचा सतत पाठलाग करीत असतात. पोटासाठी त्यांचे हे काम सुरु असते परंतु त्यांच्या या नाक खुपसण्यामुळे कलाकार प्रचंड नाराज होतात. कधी कधी तर कलाकार त्यांच्यावर बरसतातही. सारा अली आणि अक्षयकुमारचा किस्सा आम्ही तुम्हाला सांगितला होताच. विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्कानेही त्यांच्या मुलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न करू नसे असे आवाहन फोटोग्राफर्सना केले आहे. एवढेच नव्हे तर या पापाराझींना रोखण्यासाठी बाऊंसरही तैनात केले आहेत. फोटोग्राफर्सवर रागावणाऱ्या कलाकारांमध्ये आता जया बच्चन यांचीही भर पडली आहे. जया बच्चन यांचे फोटोग्राफर्सनी फोटो काढल्याने त्या प्रचंड भडकल्या आणि त्यांचा राग पाहून फोटोग्राफर्सना त्यांची चक्क माफीही मागावी लागली. हे पाहाता फोटोग्राफर अशी कामे का करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या रागाने अनेक किस्से बॉलिवुडमध्ये चर्चिले जातात. त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांच्या या रागाबाबत एकदा एका मुलाखतीत अभिषेक आणि श्वेताने त्याचे कारणही सांगितले होते. जया बच्चन यांना क्लस्ट्रोफोबिक नावाचा आजार आहे. हा आजार ज्याला असतो तो गर्दी पाहून बिथरतो, त्याला राग येतो. बाजारात, गर्दीने भरलेली वाहने किंवा लिफ्टमध्ये जर जास्त माणसे असतील तर अशा व्यक्तीला खूप त्रास होतो. त्याला कोणाचा स्पर्श झालेला किंवा धक्का लागलेला आवडत नाही. त्याशिवाय कॅमेऱ्याचा फ्लॅश डोळ्यावर पडल्यावरही त्याला राग येतो. कदाचित जया बच्चन यांच्या रागामुळे कोणी नाराज होऊ नये म्हणून अभिषेक आणि श्वेताने असे सांगितले असावे असेही बॉलिवुडमध्ये म्हटले जाते.

त्याचे असे झाले, काही दिवसांपूर्वी जया बच्चन त्यांच्या डेंटिस्टकडे निघाल्या होत्या. डेंटिस्टकडे पोहोचल्यानंतर त्या गाडीतून उतरल्या आणि दवाखान्यात जात असताना त्यांना फोटोग्राफर्सनी घेरले आणि त्यांचे फोटो काढू लागले. जया बच्चन यांना याचे प्रचंड आश्चर्य वाटले. त्यांच्या ड्रायव्हरने लगेचच खाली उतरून फोटोग्राफर्सना फोटो काढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. रागावलेल्या जया बच्चन यांनीही फोटोग्राफर्सना रागावत, ‘तुम्ही येथेही पोहोचता कसे? असा प्रश्न केला. तेव्हा फोटोग्राफर्सनी तुमची गाडी बघून आम्ही येथे आलो. आम्हाला काही फोटो काढू द्या. तेव्हा जया बच्चन सगळ्यांवर रागावल्या. त्यांचा रागाचा चढलेला पारा पाहून अखेर फोटोग्राफर्सना त्यांची माफी मागावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER