जयविक्रमचा पदार्पणातच जय आणि विक्रमसुध्दा!

Praveen Jayawickrama - Maharashtra Today

ज्याच्या नावातच जय आणि विक्रम आहे असा श्रीलंकन (Sri Lanka) फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रम (Praveen Jayvikrama) याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात विजय आणि विक्रमासह केली आहे. बांगलादेशविरुद्ध (Bangla desh) श्रीलंकेने २०९ धावांनी जिंकलेल्या कँडी येथील कसोटी सामन्यात त्याने १७८ धावांत ११ बळी (पहिल्या डावात ६/९२ आणि दुसऱ्या डावात ५/८६) मिळवले आणि कसोटी पदार्पणातच १० बळी मिळवणारा तो पहिलाच श्रीलंकन गोलंदाज ठरला. अर्थातच या कामगिरीसाठी २२ वर्षीय प्रवीण पदार्पणातच सामनावीर ठरला. कसोटी पदार्पणातच १० किंवा अधिक बळी मिळविणारा तो नरेंद्र हिरवाणीनंतरचा पहिला गोलंदाज ठरला. त्याचे १७८ धावांत ११ बळी ही डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाची पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरी आहे. दरम्यान, कसोटी पदार्पणात दोन्ही डावांत पाच किंवा अधिक बळी मिळविणारा प्रवीण जयविक्रम हा १० वा गोलंदाज आहे.

 हे १० गोलंदाज असे :

  • एफ. मार्टिन वि. ऑस्ट्रेलिया- १८९०
  • टी.रिचर्डसन वि. ऑस्ट्रेलिया- १८९३
  • क्लेरी ग्रिमेट वि. इंग्लंड- १९२५
  • सी. मेरियाॕट वि. विंडीज- १९३३
  • के. फार्नस् वि. ऑस्ट्रेलिया- १९३४
  • एच. जाॕन्सन वि. इंग्लंड- १९४८
  • एस. बुर्के वि. न्यूझीलंड- १९६२
  • बॉब मॕसी वि. इंग्लंड- १९७२
  • नरेंंद्र हिरवाणी वि. वेस्ट इंडिज- १९८८
  • प्रवीण जयविक्रम वि. बांगलादेश- २०२१

या यशस्वी पदार्पणाबद्दल जयविक्रम म्हणाला की, सुरुवातीला मला दडपण जाणवत होते; पण वरिष्ठ खेळाडूंनी मला खूप मदत केली. श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने प्रवीणच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याच्यासह रमेश मेंडीसनेही दुसऱ्या डावात चार गडी बाद केले. या दोघांचे कौतुक करताना करुणारत्नेने म्हटले की, त्यांना नियमित कसोटी सामने खेळायला मिळाले तर त्यांचा विश्वास वाढेल आणि तसे झाले तर ते दिलरुवान परेरा व रंगना हेरथ यांची जागा घेऊ शकतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button