जवानांच्या जीपला ट्रॅव्हल्सची धडक ; एका जवानाचा मृत्यू , दोघे जण गंभीर

accident in latur

लातूर / प्रतिनिधी : लातूर नजीक असलेल्या सीआरपीफ कॅम्पवरून चाकूर येथील बीएसएफ च्या कॅम्पकडे जाणाऱ्या जवानांच्या जीपला ट्रॅव्हल्सची जोराची धडक बसल्याने एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास नांदगाव पाटीजवळील घरणी रेल्वे स्थान जवळ झाला.

लातूर रजवळील सीआरपीएफच्या कॅम्पवरून जितेंद्र चौधरी (29), गंभीरसिंग आणि एल. देशमुख हे तिघे चाकूरच्या बीएसएफ कॅम्पकडे फायरिंगच्या सरावासाठी निघाले होते. त्यांची जीप नांदगाव पाटीजवळ आली असता अहमदपूरकडून येणाऱ्या खासगी बसने जवानांच्या जीपला जोराची धडक दिली यामध्ये जितेंद्र संजय चौधरी (29 रा. दहिवड ता. चाळीसगाव जि. जळगाव ) या जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीरसिंग आणि एल. देशमुख हे गंभीर जखमी झाले. पोलिस आणि नागरीकांनी जखमी जवानांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल. त्या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे.