जावेद अख्तर यांनी दाखल केला कंगनावर अब्रुनुकसानीचा दावा

Kangana -Javed Akta

बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने (Kangana Ranaut) बॉलिवूडमध्ये अनेकांशी पंगा घेतला आहे. त्यात आता जावेद अख्तर यांचीही भर पडली आहे. कंगनाने विविध प्लॅटफॉर्मवर बदनामी केल्याचा आरोप करीत प्रख्यात गीतकार, लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगनावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. कंगनानेही यावर पलटवार करीत ”एक थी शेरनी… और एक भेड़ियों का झुंड।’’ या शब्दात जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे.

जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात दावा दाखल करताना म्हटले आहे की, कंगनाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर खोटे आरोप केले होते. त्यामुळे त्यांची बदनामी झाली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर बोलताना कंगनाने बॉलिवूडमध्ये एक गट असल्याचा आरोप करीत त्यांचे नाव त्यात घेतले. जावेद अख्तर यांनी ऋतिक प्रकरणात काहीही न बोलण्याची कंगनाला धमकी दिली होती असे कंगना म्हणाली होती. कंगनाचे वक्तव्य खूपच व्हायरल झाले होते.

जावेद अख्तर यांची दावा दाखल करण्याची बातमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, ‘बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने गीतकार जावेद अख़्तर यांच्याविरोधात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टीव्हीवर अपमानास्पद वक्तव्ये केली होती. त्यामुळे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मँजिस्ट्रेटकडे दाखल करण्यात आली आहे. कंगनाने संजय राऊत यांचे ट्विट रिट्विट करीत ”एक थी शेरनी… और एक भेड़ियों का झुंड।’ असे वक्तव्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER