जसवंत सिंह जागतिक दर्जाचे मुत्सद्दी व राजनीतिज्ञ : राज्यपाल

Jaswat Singh -Maharashtra Governor

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Jaswant Singh) यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जसवंत सिंह यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. प्रखर देशभक्त, अभ्यासू व प्रभावी वक्ते असलेल्या जसवंत सिंह यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण, अर्थ व परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांची संसदेतील व संसदेबाहेरील अभ्यासपूर्ण भाषणे व वक्तव्ये आवर्जून ऐकली जात.

  जसवंत सिंह यांच्याशी माझा घनिष्ठ परिचय होता हे माझे भाग्य होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक जागतिक दर्जाचा मुत्सद्दी व राजनीतिज्ञ गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो, अशी प्रार्थना करतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांचे चिरंजीव मानवेंद्र सिंह व इतर परिवार जनांना कळवितो, असे राज्यपालकोश्यारी यांनी शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER