जपानमधली ‘करोना आणीबाणी’ संपली, शिंजो आबे यांची घोषणा

Shinzo abe
टोकियो : जपानमधली करोना आणीबाणी संपली अशी घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली. करोनाच्या नव्या रुग्णांचं प्रमाण घटल्याने देशातील करोना मागे घेण्यात आली,  असे शिंजो आबे म्हणालेत.
आम्ही ही आणीबाणी उठवण्यासाठी एक विशिष्ट धोरण आखले होते. त्या धोरणानुसार देशात आढळणाऱ्या नव्या करोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे आता आणीबाणीची गरज रहितली नाही म्हणून आणीबाणी उठवत आहोत असे आबे यांनी सांगितले.

 

आमचा देश करोनाविरोधातली लढाई अत्यंत योग्य पद्धतीने लढतो आहे. त्यामुळे देशात असलेली करोना आणीबाणी आम्ही संपवतो आहोत अशी घोषणा पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली.