जपानही टाकणार ‘टिकटॉक’सह चिनी अ‍ॅप्सवर बंदी

Japan will also ban Chinese apps, including Tiktok

सुरक्षेच्या कारणास्तव भारताने ‘टिकटॉक’सह (Tiktok) काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेनंही भारताच्या या निर्णयाचं समर्थनही केलं. आम्हीही असे पाऊल उचलणार असल्याचे म्हटले होते. आता जपानदेखील (Japan) टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅप्सवर (Chinese apps) बंदी घालण्याच्या विचारात आहे.

जपानमध्ये चीन पब्लिशर्सकडून तयार करण्यात आलेल्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा लोकप्रतिनिधींचा विचार सुरू असल्याची माहिती एनएचके वर्ल्डने आपल्या अहवालात दिली आहे. भारत आणि अमेरिकेप्रमाणेच लोकप्रतिनिधींनी सुरक्षेबाबत चिंताही व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त युजर्सचा सर्व स्थानिक डेटाही अशा अ‍ॅपद्वारे चीनच्या सरकारच्या हाती लागू शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.

सप्टेंबर महिन्यापर्यंत हा प्रस्ताव सरकारसमोर सादर होण्याची शक्यता आहे. जपानमध्येही टिकटॉकची क्रेझ आहे. सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत टिकटॉक पाचव्या क्रमांकावर आहे. भारतातदेखील टिकटॉक आघाडीवर होते.

टिकटॉकमध्ये अमेरिकन सीईओ आणि इंडस्ट्री, अमेरिकन लष्कर आणि लॉ-इन्फोर्समेंट डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्षे कार्यरत असलेले चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर्स आहेत. अमेरिकेची टीम आमच्यासाठी सर्वांत सक्षम अशा सुरक्षेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी काम करते आहे, अशी माहिती टिकटॉकच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. युजर्सचा सर्व डेटा अमेरिका आणि सिंगापूरमधील सर्वरमध्ये सेव्ह करण्यात येतो. त्यामुळे तो सोप्या पद्धतीने ‘अॅक्सेस’ करता येत नाही, असे टिकटॉकने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER