कोल्हापुरात 11 ते 16 सप्टेंबरमध्ये जनता कफ्यु : व्यापारी तयार

Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापुरात 11 ते 16 सप्टेंबरमध्ये जनता कफ्यु करण्याचा निर्णय आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय घेण्यापूर्वी रेडिमेड कापड व्यवसायिकांनी याला विरोध केला. त्यामुळे या बैठकीत हातवारी आणि आरे तुरेपर्यंत वाद गेला. अखेर कापड व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त करून काढता पाय घेतला. काहींनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला. मात्र चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी जनता कर्युचा निर्णय बैठकीत जाहीर केला. जनता कर्फ्युमध्ये औद्योगिक वसाहतीतील काम, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, औषध दुकान, दूध आणि बँका सुरूच राहणार आहे, तर भाजीपाला, किराणा, मसाले, इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे ठरले.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक बंद पाळण्याचा निर्णय घेवूया, असे अवाहन चेंबरचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक आनंद माने यांनी येथे केले. यावेळी रेडिमेड कापड व्यवसायिकांनी त्याला विरोध केला. किती दिवस बंद ठेवायचे, प्रशासन त्यांचे अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन करीत आहे, पहिला लॉकडाऊन नियोजनासाठी होता तो मान्य लॉकडाउन करूया अशी भूमिका घेतली.

तरीही औद्योगिक यामुळे बैठकीत वाद झाला. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. रोज किमान 700 ते 800 नवे कोरोना रूग्ण सापडत आहेत. यावरून जिल्ह्यात समुह संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट होत असल्याने काही दिवस व्यापार बंद करण्याचे ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER