भारत बंदला जनता दलाचा पाठिंबा

भारत बंद - Bharat Bandh

कोल्हापूर : केंद्रातील भाजप (BJP) सरकारने बहुमताच्या आधारे शेती आणि कामगार धोरणविषयक कायदे मंजूर करून शेती क्षेत्र भांडवलदार व्यापाऱ्यांना खुले केले आहे. या विरोधात अनेक राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरलेले असतानाच कामगारांना नोकरीची शाश्वती नाकारणाऱ्या, ३०० पर्यंत कामगार असलेले उद्योग विनापरवानगी बंद करण्यास मान्यता देणाऱ्या कायद्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

यावरून शेतकरी आणि कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली असून सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा देशव्यापी निषेध केला जाणार आहे. विविध कामगार संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे.

जनता दल (Janata Dal) (से) पक्षानेही या शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करीत असून शुक्रवारच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होत आहे. पक्षाचे राज्यभरातील कार्यकर्त्ये जागोजागी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होतील तसेच सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपोषण करून या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे तसेच दिवसभराच्या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश अध्यक्ष प्रा. शरद पाटील, प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER