जनता कर्फ्यू हा कोरोनावर पर्याय नव्हे : खासदार संभाजीराजे

SambhajiRaje

कोल्हापूर : कोरोनाचा (Corona) वाढता फैलाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू हा पर्याय नव्हे, असे सांगत याबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून त्यानुसार वागणे आवश्यक असल्याचे खासदार संभाजीराजे (Sambhaji raje) यांनी स्पष्ट केले.

खा. संभाजीराजे यांनी जनता कर्फ्यू (Janata Curfew) बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. यामुळे काही ठिकाणी जनता कर्फ्यू लागू केले जात आहेत; मात्र जनता कर्फ्यू हा काही पर्याय नाही. यापूर्वी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले. त्यामध्ये उद्योग, व्यवसाय मोठ्या प्रमाणात बंद राहिले. अनेक व्यवहार बंद होते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

या सर्व बाबींचा विचार करता जनता कर्फ्यू ऐवजी लोकांच्या मध्ये जनजागृती करणे, त्यांच्यात जागरुकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली, प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले, लक्षणे दिसताच तपासणी करून घेतली, वेळीच उपचार करून घेतले, तर ऑक्सिजनेटेड बेड, व्हेंटिलेटर आदीची गरजच भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER