सांगली आणि कोल्हापुरात उद्यापासून जनता कर्फ्यु

सांगली आणि कोल्हापुरात उद्यापासून जनता कर्फ्यु

सांगली : कोल्हापूर शहर सांगली जिल्ह्यात  उद्या शुक्रवारपासून (दि. 11) दहा दिवस होणारा जनता कर्फ्यू (Janata curfew) हा ऐच्छिक असेल. कोणावरही बंधनकारक किंवा सक्ती राहणार नाही, असे दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा (Corona) संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याला आळा घालण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी आणि शारिरीक अंतर ठेवण्यासाठी जनता कर्फ्यू शिवाय आता पर्याय नाही. लोकांनीच आता स्वतःहून कामाशिवाय घराबाहेर पडण्याचे टाळले पाहिजे. नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामीण मधील अनेक गावांनी पाळलेल्या जनता कर्फ्युमुळे संबंधित गावातील कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जनता कर्फ्युचे महत्व अधोरेखित झालेले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनतेला संपूर्ण सहकार्य दिले जाईल. मात्र याबाबत कोणावर बंधन किंवा सक्ती असणार नाही. व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्यूला केला आहे. कोल्हापूर शहरातील जनता कर्फ्यूला सर्वपक्षीय कृती समितीचा विरोध आहे, तर सांगलीतील कर्फ्यूला शिवसेनेने विरोध केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER