आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेचे जळगावात जंगी स्वागत

Aditya Thackeray

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ आजपासून जळगाव जिह्यातून होणार आहे. आज जळगावात आगमन होताच आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिक, युवासैनिक व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी जंगी स्वागत केले.

ही बातमी पण वाचा :- आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात

ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी नाही दिले, त्यांची मने जिंकायची आहेत , असे वक्तव्य करत आदित्य यांनी आजपासून जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ केला . या यात्रेत आदित्य लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करणार असल्याचे समजते.

aaditya-thackeray

मुंबई येथून विमानाने आदित्य ठाकरे यांचे जळगावात आगमन झाले . त्यानंतर जळगावच्या किसनजीनगरातील प्रसिद्ध गणपती मंदिरात आदित्य ठाकरे हे पूजा करून मार्गस्थ होणार आहेत . जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिरसोली येथे वृक्षारोपण व स्वागत झाल्यावर पाचोरा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक, लक्ष्मीनगर याठिकाणी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.