जमता जमेना हे वेळेचे गणित !

Sun

संक्रांतीपासून कणाकणाने दिवस मोठा होतो असे म्हणतात .सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, उत्तरायण सुरू होते. तिळगुळ, गुळाची पोळी ,हळदीकुंकू या बरोबरच मला सगळ्यात आनंद होतो तो दिवस मोठा होतो म्हणूनही. प्रत्येक स्त्रीची ही कायम तक्रार असते बघा ! “वेळ कसा जातो ना अजिबात कळत नाही !” जगातील प्रत्येक व्यक्ती पळते आहे. तरीही वेळ हे एक पुढे पळणारे मृगजळच आहे असं मला वाटायला लागलं आहे .म्हणूनच आज मनी मॅनेजमेंट वेळेचे नियोजनाला महत्त्व प्राप्त झाले बघा! पण हि वेळही खूप मिश्कील आहे. ती करायची कामे आणि वेळ यात समन्वय मुळी साधूच देत नाही. एक सुभाषित आहे ,की वेळ ही अमूल्य गोष्ट आहे. त्याचे मूल्य होऊच शकत नाही. या “महत्व” या अर्थाने बघितलं तर अमुल्य म्हणता येईल. परंतु खरं बघितलं तर तिला ‘ मूल्य ‘आहे.

कारण एखाद्या कंपनीला आपण आपला वेळ ,कौशल्य ,बुद्धिमत्ता देतो. तेव्हाच आपल्याला पगार मिळतो .म्हणजेच आपण एक प्रकारे आपली वेळी त्यांना भाड्याने देतो, किंवा विकतो म्हणा की ! “वेळ ही गुंतवणूक आहे आणि आयुष्यातील महत्त्वाचे भांडवलही ! “यावर विश्वास ठेवायला लागतो. कारण इतर सर्व गोष्टी असतील, जसे पैसा ,कौशल्य ,बुद्धिमत्ता सगळी अनुकूलता आहे, प्रेरणा इच्छा पाठिंबाही आहे. पण क्षणाचीही फुरसत म्हणून नाही. काय होईल ? काहीच करता येणार नाही. त्याचप्रमाणे तीच एक गुंतवणूकही ठरू शकते. कारण बऱ्याच गोष्टींसाठी आपण जो वेळ देतो वर्तमानात, किंवा सद्यस्थितीमध्ये त्याचा फायदा आपल्याला भविष्य काळामध्ये निश्चितपणे मिळतो. उदाहरणार्थ ,एखाद्या क्षेत्रात काम करणाऱ्याला अापले ज्ञान अपडेट ठेवणे खूप आवश्‍यक असते. त्यामुळे त्यासंबंधीचे वाचन, नोट्स काढणे आवश्यक ठरते.

एखाद्या वृद्ध प्रौढ व्यक्ती आहे,परंतु तिला तिची तब्येत चांगली राखण्यासाठी आज योगासनं साठी वेळ देणे खूप गरजेचे आहे तो वेळ तिची भविष्यकाळातल्या सुदृढ तब्येती साठीची असणारी गुंतवणूक ठरणार आहे . विद्यार्थी दशा सर्व भावी भविष्यकाळाचा पाया मग अशा वेळी खरे तर आपल्या वेळेचा योग्य केला म्हणजेच योग्य गोष्टींमध्ये वेळ घालवला तर तो त्याचे पुढील आयुष्य सुंदर करण्यामध्ये हातभार लावणार म्हणजे तीही त्याच्या भावी आयुष्यासाठी गुंतवणूक ठरणार आहे.

मनुष्यप्राणी त्याला असलेल्या बुद्धीमुळे म्हणा, एकदम भूतकाळातील आठवणी व भविष्यातील चिंता यात जास्त गुरफटलेला असतो की काय? माहित नाही. कारण मुंग्या पावसाळ्याची बेगमी म्हणून आपल्या वारुळात धान्य जमा करून ठेवतात. किंवा पक्षी अंडी घालण्यासाठी घरटी बांधतात. या दोन्ही धरणांमधे भविष्य वेगळी दिसते, म्हणजे कृतिशीलता दिसते. चिंतेमुळे वेळ घालवणे दिसत नाही, भविष्याच्या चिंतेने जगणे दिसत नाही. मात्र पूर्णपणे वर्तमानात जगू शकणाऱ्या व्यक्ती विरळाच.

वेळ किंवा घड्याळ असतं धावतोय असं वाटतं त्यामागे कारणही तेच. सगळ्या कार्यक्षम ,कर्तबगार व्यक्तींना बघितलं तर घड्याळ वेळ त्यांच्यासाठी तेवढीच असते. परंतु त्यांना वेळ आहे हा प्रश्न कधीच नसतो .उलट भरपूर वेळ वेळ उपलब्ध आहे असं म्हणतात. मग इतरांचे गाडी अडते कुठे ? वर्तमान काळात कारण आपण फारच कमी वेळ राहू शकतो. तो” या क्षणात”जगण्याचा प्रत्येकाचा span वेगवेगळा असतो. हातात असलेल्या कामावर पूर्ण लक्ष असलेले लोक कमी असतात किंवा त्यांचे एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष असून ते सर्वत्र सारखे काम करते करू शकता की ज्याला आपण “मल्टी टास्किंग” म्हणतो. परंतु अन्यथा बहुतांश जणांचे” अचपळ मन माझे न अावरे आवरीता ! “हीच परिस्थिती असते आणि असे चंचल मन धावत सुटले ही वेळ थोडाच आपल्यासाठी थांबणार आहे ? वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नसतो म्हणतात. आपण असा काही वेळ भविष्यकाळात तर काही भूतकाळात हरवायला लागलो तर वेळेचे नियोजना चे बारा नाही वाजले तरच नवल !

या वेळेचे खूप पैलू असतात बघा! आपल्याला वाटतं वेळ मर्यादित असतो आणि आपला आयुष्य अमर्याद आहे की काय ? पण तसं बघितलं तर आपण अस्तित्वात असू वा नसू, वेळ घड्याळ आणि त्यांची कृती तशीच राहणार आहे. म्हणूनच सतत ॲक्टिव्ह राहून आपल्या आयुष्याचा योग्य उपयोग करायला हवा असतो आणि मिनीटाच्या सेकंदाचा देखील ! वेळ अमर्याद आहे परंतु’ हा ‘ क्षण मात्र परत येणार नाही. त्यामुळे तर त्याचा उपयोग अतिशय सर्जनशीलतेचा करायला हवा.

बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या त्याच वेळी केलेल्या योग्य असतात. उदाहरणार्थ कुणाला रिटर्न गिफ्ट द्यायचे आहे, कुणाला शाबासकीचा फोन करायचा आहे, किंवा शुभेच्छा द्यायचे आहेत. मला कुणाला वयाने मोठ्या व्यक्तीला भेटायची खूप इच्छा असते, तेव्हा नक्की ताबडतोब जायला हवं असे उदाहरण असतात. नाहीतर ती व्यक्ती निघून जाते आणि हुरहूर आयुष्यभर टोचत राहते. अ गदी शिक्षा द्यायची गोष्ट बघा. लहान मुलाने एखादी चुकीची गोष्ट केली आणि आपण त्याला आठवडाभराने फटका दिला. तर? काय उपयोग होईल ? उलटे मुल आपल्याला मूर्ख समजेल किंवा स्वतः कन्फ्युज होईल.
काही गोष्टी अशा असतात “ज्यांची वेळच यावी लागते”असं म्हणतात ते अगदी सत्य आहे .काही गोष्टी घडाव्यात असे आपल्याला वाटत असते पण खूप प्रयत्न करूनही त्याकडून येत नाही, त्यासाठी वाट बघावी लागते. पण कधी तरी त्यावर प्रयत्न करणे सोडल्यावर अचानक ही गोष्ट घडते असे ही अनुभव येतात.

या वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे .वेळेचे नियोजन म्हणजे काय तर प्राप्त वेळेचा आपल्या उद्दिष्टांसाठी केलेल्या प्रभावी वापर आहे. ज्यांना उद्दिष्टे नाहीत व पक्की नाही त्यांना हा प्रश्न खूप पडतो. दुसरी गोष्ट प्रभावी वापर हाही शब्द तितकाच महत्त्वाचा ! तो पाहण्यासाठी व्यक्तीने वास्तवात वर्तमानात जगणे ही आवश्यक असते. फ्रेंड्स ! तुम्ही करतच असणार नेहमी असं वेळेचे नियोजन . हो ना? किती पूर्ण होत ते ? नक्की कळवा !

मानसी गिरीश फडके
समुदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER