जम्मू-काश्मीरच्या नकाशात चूक; केंद्र सरकारची ट्विटरला नोटीस

PM Narendra Modi - Twitter

दिल्ली : नकाशात लेहमधील भाग जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu – Kashmir) दाखवला. या प्रकरणी केंद्र सरकारने (Central Government) ट्विटरकडून स्पष्टीकरण मागितले आहे. हा भाग केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये का दाखवण्यात आला नाही, अशी विचारणा नोटीसमध्ये केली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवली आहे. चुकीचा नकाशा दाखवून भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का करू नये? अशी विचारणा मंत्रालयाकडून करण्यात आली असून उत्तर देण्यासाठी पाच दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.९ नोव्हेंबरला ही नोटीस पाठवण्यात आली.

पूर्वीचे जम्मू-काश्मीर राज्य जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित करण्यात आले आहे. लेह हा लडाखचा भाग आहे, हे उल्लेखनीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER