जम्मू-काश्मीर : चकमकीत चार दहशतवादी मारले

- केरन सेक्टरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

Four terrorists killed in clashes

जम्मू कश्मीर : आज वेगवेगळ्या भागांत जवानांनी केलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी पुलवामा व कुलगाम जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना ठार केले. केरन सेक्टरमध्ये जवानांनी केलेल्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. कुलगाम जिल्ह्यातील चिंगम भागात दहशतवादी व जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे.

आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. शनिवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील दडुरा भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरून दोन एके-४७  रायफल जप्त करण्यात आल्या.

दरम्यान शुक्रवारी रात्री उत्तर काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या शस्त्रास्त्रांची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आली आहे. या साठ्यात चार एके-४७  रायफल्स, आठ काडतुसे, रायफलच्या २४० बुलेट व काही बंदुका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER