गोलंदाजात हा विक्रम फक्त जेम्स अँडरसनचाच!

James Anderson

इंग्लंडचा (England) जेम्स अँडरसन (James Anderson) हा 606 विकेटसह कसोटी क्रिकेटमध्ये जलद गोलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. इतर कोणत्याही जलद गोलंदाजाने त्याच्यापेक्षा अधिक विकेट काढलेल्या नाहीत. 2003 मध्ये पदार्पण केल्यापासून अजूनही त्याने आपला फाॕर्म टिकवून ठेवला आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात 40 धावात सहा बळी मिळवले आणि 2007 पासून दरवर्षी किमान एकदा तरी कसोटी डावात 5 किंवा अधिक बळी मिळवण्याची परंपरा कायम राखली. अँडरसनने 2003 मध्ये पदार्पण केले तेंव्हापासून केवळ 2004, 05 आणि 06 या तीन वर्षांचा अपवाद सोडला तर दरवर्षी किमान एकदा तरी डावात पाच बळी मिळवले आहे.

श्रीलंकेविरुध्द (Srilanka) गाॕल(Galle) कसोटीत 40 धावात 6 विकेट काढताना त्याने एक असा विक्रम केला जो दुसऱ्या कोणत्याही गोलंदाजाला जमलेला नाही. शेन वाॕर्न, मुथय्या मुरलीधरन व अनिल कुंबळे यांनी त्याच्यापेक्षा अधिक गडी बाद केले आहेत पण त्यांनासुध्दा हा विक्रम जमलेला नाही. तो विक्रम म्हणजे अँडरसनने आपल्या गोलंदाजीवर सर्वाधिक म्हणजे तब्बल 51 क्षेत्ररक्षकांना झेल घेण्याची संधी दिली आहे. इतर कोणत्याही गोलंदाजांच्या गोलंदाजीवर एवढ्या क्षेत्ररक्षकांनी झेल घेतलेले नाहीत.

अँडरसनच्या 606 विकेटपैकी 401 विकेट ह्या झेलबादच्या आहेत. यापैकी 21 झेल बदली क्षेत्ररक्षकांनी घेतले आहेत. ते विचारात घेतले असते तर अँडरसनचे क्षेत्ररक्षकांचे हे अर्धशतक कधीच पूर्ण झाले असते.

जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर ज्या क्षेत्ररक्षकांनी झेल घेतले आहेत ते असे..

 • मॕट प्राॕयर- 68
 • जाॕनी बेयरस्टो- 49
 • अॕलीस्टर कूक- 40
 • जोस बटलर- 30
 • जी.पी. स्वान- 21
 • अँड्र्यु स्ट्राॕस- 20
 • जो रुट – 19
 • पाॕल कालिंगवूड- 14
 • टी.आर.अॕम्ब्रोज- 13
 • इयान बेल- 12
 • बैन स्टोक्स- 12
 • केव्हिन पीटरसन- 10
 • मोईन अली- 6
 • स्ट्युअर्ट ब्रॉड- 5
 • इलिअट ट्रॉट- 5
 • जी.ओ. जोन्स- 5
 • जी.एस. बॕलन्स- 4

डेव्हिड मालन, मार्कस् ट्रेस्कोथीक, डाॕमिनीक सेल्बी, ख्रिस रिड – प्रत्येकी 3

अँड्र्यु फ्लिंटॉफ, मायकेल वाॕन, एन आर काॕम्पटन, अॕलेक्स हेल्स, मार्क बुचर, ख्रिस जॉर्डन, अॕलेक स्ट्युअर्ट, बेन फोक्स, इ. टी. स्मिथ, एल.ए. डाॕसन – प्रत्येकी 2 झेल

इतर – 20 झेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER