फलंदाजांना शून्यावर बाद करण्यात जेम्स अँडरसन आघाडीवर

James Anderson - Shubman Gill

इंग्लंडचा (England) जलद गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) हा सद्यस्थितीत कसोटी क्रिकेटचा सर्वात आघाडीचा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 612 विकेट आहेत आणि यादरम्यान त्याने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यापैकी एक विक्रम त्याने शुभमन गिल (Shubman Gill) याला शून्यावर बाद करुन आपल्या नावावर केलाय. तो म्हणजे कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक फलंदाज शून्यावर बाद करण्यात आॕस्ट्रेलियाच्या ग्लेन मॕकग्रासह (Glenn McGrath) तो आघाडीवर आहे. या दोघांनीही प्रत्येकी 104 फलंदाज शून्यावर बाद केले आहेत.

त्याच्या या 104 भोपळ्याच्या विकेटमध्ये उजव्या हाताचे फलंदाज 71 आणि डावखुरे 33 आहेत.

त्याने 29 सलामी फलंदाजांना भोपळासुध्दा फोडू दिलेला नाही. अँडरसनने शुन्यावर बाद केलेले क्रमनिहाय फलंदाज असे.

एक – 15
दोन – 14
तीन – 10
चार – 04
पाच – 06
सहा – 03
सात – 05
आठ – 07
नऊ – 13
दहा – 09
अकरा – 18

भोपाळ्यावर बाद झालेल्या या फलंदाजांमध्ये, भारताचे 26, न्यूझीलंडचे 10, दक्षिण आफ्रिकेचे 13, वेस्ट इंडिजचे 15, आॕस्ट्रेलियाचे 12, पाकिस्तानचे 17, श्रीलंकेचे 8 आणि झिम्बाब्वेचे 3 फलंदाज आहेत. बांगलादेश, अफगणिस्तान आणि आयर्लंडच्या एकाही फलंदाजाला तो शून्यावर बाद करु शकलेला नाही. यापैकी अफगाण व आयर्लंडविरूध्द तो अद्याप कसोटी सामनाच खेळलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER