जलयुक्त शिवार योजना फसवी, ‘युनिक रिसर्च’ संस्थेचा अहवाल

मुंबई :- देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजना फसवी होती, शिवाय जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा ‘युनिक रिसर्च’ या संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये निकृष्ट दर्जाची कामं झाली असून, शेकडो गावं दुष्काळमुक्त केल्याचा दावाही खोटा आहे. ४ वर्षाच्या अर्थ संकल्पानुसार ७ हजार कोटी खर्च झाल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात किती खर्च झाला याचा आकडा जाहीर झालेला नाही. त्यामुळे पारदर्शक सरकारमधील महत्वकांक्षी योजनेत पारदर्शकतेचाच अभाव असल्याचं, या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मुलीचं पालकत्व स्वीकारत धंनजय मुंडे म्हणाले, ‘बाळ शिवकन्या औक्षवंत हो’

त्याचप्रमाणे, जलयुक्त शिवार अभियान योजना नेमकी कोणासाठी होती? राज्यभरात या योजनेचं निव्वळ कंत्राटीकरणच झालं. योजना राबवताना प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याच हाती सगळी सूत्रं होती. शिवाय शेकडो गावं दुष्काळमुक्त केल्याचा दावा फोल असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं झाली आहेत. मात्र याच ठिकाणी चौपट पैसे दिल्याचं धक्कादायक वास्तव आहे. शिवाय शेकडो गावं दुष्काळमुक्त केल्याचा दावा फोल असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. राज्यातील एकूण १२५ गावांचा प्रत्यक्ष घटनास्थळांवर जाऊन जवळपास दीड वर्ष अभ्यास करण्यात आला. यात कामाची गुणवत्ता, खर्च, त्याचा स्थानिक जलसाठ्यावर झालेला परिणाम अशा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करण्यात आला.

या योजनेची जी कामं झाली असा दावा करत वेगवेगळ्या ठिकाणी कामं झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या. मात्र, त्याप्रमाणे प्रत्यक्षात जाऊन पाहिले असता अशा अनेक ठिकाणी कामं झालीच नसल्याचंही धक्कादायक वास्तव या अहवालात उघड झालं आहे.त्यामुळे रचना आणि अंबलबजावणी या दोन्ही पातळीवर जलयुक्त शिवार योजना सपशेल नापास आहे, असा शेरा या अहवालात देण्यात आला आहे.