
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या कार्यकाळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) योजनेच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. मराठावाड्यातून ही चौकशी सुरू झाली असून त्यामुळे भाजपच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेची जिल्हानिहाय चौकशी होणार आहे. एकूण २ हजार ४१७ कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. मराठवाड्यात ६ हजार २० गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली होती. यावेळी अनेक गुत्तेदार आणि मजूर संस्थांनी घोटाळे केल्याचा संशय असल्याने ही चौकशी करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील जलयुक्त शिवार कामाची जिल्हानिहाय चौकशी करण्यासाठी जलसंधारण आणि आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती जलयुक्तचे जिल्हानिहाय रेकॉर्ड तपासणार आहे. मराठवाड्यातील तब्बल पावणेदोन लाख कामे संशयाच्या भोवऱ्यात असल्याने ही चौकशी होत आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला