जालना: तरुण ठेकेदारांचा डोक्यात गोळ्या झाडून खून

पत्रकार-पोलीस समन्वय ग्रुपची माहिती

contractor-shot-dead

जालना :- प्रतिनिधी- बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे (वय 43) यांचा जालना औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरवठा करण्याचा व्यवसाय होता._ त्यांना अज्ञात गुंडांनी गावठी पिस्तुल व्दारे टिपले आहे. औरंगाबाद रोडवरील शेलगावनजीक परवा 7.45 वाजेच्या सुमारास घडलेली ही खळबळजनक घटना असून _त्यांच्यावर वर्षभरापूर्वी चंदनझिरा परिसरात दोन ते तीन गुंडांनी भ्याड हल्ला केला होता.

यामध्ये त्यांचे दोन पाय फ्रॅक्चर झाले होते._याप्रकरणी त्यावेळी एका सराईत गुन्हेगारासह एका जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता._त्यावेळी आरोपींना अटक करण्यात आली होती._ दरम्यान, काही दिवसापूर्वी संजय अंभोरे यांनी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन आपल्या जीवितास धोका असून, आरोपीकडे गावठी पिस्तूल असल्याची तक्रार केली होती._ मात्र परवा रात्री 7.30 वाजेच्या सुमारास संजय अंभोरे हे शेलगावजवळच असलेल्या राजपूतवाडी गावाजवळून त्यांच्या कारमधून (एमएच21, एजे- 4141) जात असताना त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी अडविले व त्यानंतर त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून पाठीमघून डोक्यावर आणि एक छातीवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या._ यामध्ये गंभीर जखमी असलेल्या अंभोरे यांना तातडीने जालन्याच्या दीपक हॉस्पिटलमध्ये दाखले केले होते. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत पत्रकार- पोलीस समन्वय ग्रुप हया वॉटसअप ग्रुपने पोलीस ठाण्यात माहिती कळविली असे कळते या वरून संबंधित अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेंत.