जालना:घरफोडी करून दागिने चोरणाऱ्या ३ आरोपींना अटक,१० किलो चांदीसह,सोने,रोख रक्कम जप्त

जालना शहरातील नळगल्ली परीसरातील अंशुल आबड यांच्या घरातून वाड्याचे कुलूप तोडून (burglary) १४ फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती.हि चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे.सागरसिंग अंधरेले, मखनसिंग भादा,अर्जुनसिंग भोंड अशी आरोपींची नावं असून पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या चोरीप्रकरणी तपासाचे आदेश दिले होते.या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी वेगवेगळे पथक तैनात केले होते.तपासा दरम्यान ही चोरी सागरसिंग अंधरेले याने केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता सहकाऱ्यांसह चोरी केल्याचं कबूल केलं असून चोरीचे दागिने शहरातील आकाश कुलथे याला विकल्याचे कबूल केले.दरम्यान या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी १२० ग्रॅम सोन्याची लगड,१० किलो चांदी,१ लाख ८० हजार रोख रक्कम असा एकूण १३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER