जल्लोष, मिरवणुका थांबवा; निवडणूक आयोगाचा इशारा

election commission of india - Maharashtra Today

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ आणि आसाम येथे विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्यापूर्वीच निवडणूक आयोगाने या राज्यांना कोविड नियमांचे पालन करण्याबाबतचा इशारा दिला होता. पण, निकाल घोषित होताच विजयी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून आयोगाने जल्लोष तातडीने थांबवण्याचे आदेश दिले.

या जल्लोषासाठी जबाबदार असणाऱ्या एसएचओ आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाने दिला. परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

निकालांचा कल येण्यास सुरुवात होताच तामिळनाडूमध्ये पक्षाला आघाडी मिळत असल्याची माहिती मिळताच द्रमुकच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी गर्दी केली. एकमेकांना मिठाई खाऊ घालणे सुरू केले. बंगालच्या आसनसोलमध्येही फटाके फोडत तृणमूलच्या समर्थकांनी धुडगूस घातला होता.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल समर्थकांनी पक्ष आघाडीवर असल्याचे लक्षात येताच सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करत मोठ्या संख्येनं विविध ठिकाणी ढोल-ताशे वाजवत जल्लोष केला. देशातील विविध भागांमध्ये दिसलेल्या या चित्रांमध्ये लोकांनी मास्कही लावले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगही पाळले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button