तृणमूलमध्ये जल्लोष

mamata banerjee - Maharashtra Today

कोलकाता :- पश्चिम बंगाल निवडणुकीच्या सर्व जागांचे कल हाती आले असून तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर हालचाली सुरू झाल्या आहेत. मोठा तंबू उभारण्यात आला असून मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर ११ वाजताच्या सुमाराला तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा कल स्पष्ट झाला. तृणमूल २०० जागांच्या  जवळपास जाईल असा अंदाज आहे. ज्या मतदारसंघात तृणमूलचे उमेदवार पुढे आहेत तिथे तृणमूलचे कार्यकर्ते रंग उधळून विजयोत्सव साजरा करत होते. मात्र, कोरोनामुळे विजयाच्या मिरवणुकांना बंदी असल्याने मोजकेच कार्यकर्ते या विजयोत्सवात भाग घेत आहेत. जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दरम्यान, नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी भाजपाचे शुभेन्दू अधिकारी यांच्यापेक्षा बऱ्याच माघारल्या असल्याने तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा उत्साह थोडा कमी झाला आहे. मात्र, १ वाजताच्या सुमाराला ममता बॅनर्जी यांनी अधिकारी यांच्यावर सुमारे दीड हजार मतांनी आघाडी घेतली आहे.  यामुळे ही लढत रंगतदार झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button