अजितदादांना लहानपणी सायकलवरून शाळेत नेणारे जालिंदर आजारी ; अजित पवारांनी क्षणात सगळी सुत्रे हलवली

Sunilkumar Musale - Ajit Pawar

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे (NCP) नेते, पुण्याचे पालकमं६ी अशी सगळी पदे सांभाळत राज्याचा कारभार हाकण्यासोबतच अजित पवार (Ajit Pawar) अत्यंत भावूक असे कुटुंब प्रमुख आहेत याची प्रत्यक्ष ओळख त्यांचे स्विय्य सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी करून दिली आहे.

निमित्त ठरले ते अजित पवार यांच्या बालपणापासून त्यांच्या घरात काम करणारे जालिंदर शेंडगे आजारी असण्याचं. सुनीलकुमार मुसळे सांगतात, मी गेली दोन दशकं दादांच्यासोबत काम करतोय. दादांचा राजकीय पिंड मला जवळून बघता आलाय.पण दादांचा कुटूंबवत्सल स्वभाव त्याहून मला जवळून बघता आलाय.उपमुख्यमंत्री असणाऱ्या दादांची कुटूंबवत्सलता मला खूप भावली आहे. कुटूंबासाठी दादा किती संवेदनशील आहेत याचे अनेक अनुभव त्यांचा पीए म्हणून मला सांगता येतील.”

दादांचे कुटुंब हे खूप व्याप्त आहे.त्यात चुलते, पत्नी, मुले भाऊ,पुतणे,असा मोठा परिवार आहेच पण दादांच्या कुटूंबात दादांच्या घरातील सर्व नोकर,त्यांची मुले, त्यांचे नातेवाईक असतात.दादा कितीही व्यस्त असले तरी ते आपला कुटुंबवत्सल स्वभाव सोडत नाहीत.त्यांचे वात्सल्य तेच राहते. जालिंदर शेंडगे हे अजित दादांच्या लहानपणापासून पवार कुटूंबाच्या सेवेत आहेत. दादा लहान असताना त्यांना सायकलने शाळेत पोहोचवण्याचे काम शेंडगे करत होते. दादा आमदार झाले, खासदार झाले, राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांचा तोच जिव्हाळा कायम राहिला.जालिंदर आणि त्यांचा ऋणानुबंध तोच राहिला.

अधूनमधून दादा त्यांची चौकशी करतात. गेले दोन दिवस दादा वेगवेगळ्या व्यापात आहेत. कामाचा धडाका सुरू आहे. या काळात दादांना अजिबात वेळ नसतो.त्याचवेळी एका कार्यक्रमात दादांना निरोप येतो, “जालिंदर खूप आजारी आहे.”तो निरोप ऐकताच दादांच्यातील नेत्यांवर कुटुंबप्रमुख विजय मिळवतो. दादा तिथूनच फोनाफोनी सुरू करतात.’काहीही करा पण जालिंदरला बरं करा.”दादा जिव्हाळ्याने सांगत राहतात.जालिंदर जोवर दवाखान्यात जात नाही तोवर स्वतः पाठपुरावा करत राहतात.”

जालिंदरवर उपचार सुरू झाल्यावरच दादांच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळतो. गेली काही वर्षे सोबत असल्याने मलाही समजत आता दादा तणावात नाहीत.या काळात तसच झालं.आणि कडक कणखर दादांच्यातील संवेदनशील कुटुंबप्रमुख बघितला.

अशा शब्दांत अजित पवार यांचे स्विय्य सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांनी बेधडक, आक्रमक, करारी बाण्याच्या अजितदादांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER