‘जलीकट्टू’ बाहेर पण एकता कपूरचा ‘बिट्टू’ ऑस्करच्या शर्यतीत

bittu

आमिर खानच्या ‘लगान’ सिनेमानंतर ऑस्करच्या यादीत एकही भारतीय सिनेमा आपले स्थान निर्माण करू शकलेला नाही. भारतातर्फे प्रत्येक वर्षी ऑस्करसाठी सिनेमे पाठवले जातात पण ते सिनेमे ऑस्करच्या ज्युरींना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरतात आणि बाहेर फेकले जातात. यावर्षीही भारतातर्फे मल्याळम भाषेतील ‘जलीकट्टू’ (Jalikattu)सिनेमा 93 व्या ऑस्कर पुरस्काराच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरसाठी पाठवण्यात आला होता. पण 15 सिनेमांच्या अंतिम यादीतही हा सिनेमा आपले स्थान मिळवू शकला नाही आणि ऑस्करच्या रेस मधून बाहेर गेला. त्यामुळे यावेळीही ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व नसेल असे वाटत असतानाच एकता कपूरने तयार केलेला लघुपट मात्र ऑस्करच्या अंतिम यादीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे एकता कपूरच्या (Ekta Kapoor) कॅम्पमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एकता कपूर, ताहिरा कश्यप आणि गुनीता मोंगा यांनी ‘बिट्टू’ (Bittu) या लघुपटाची निर्मिती केली असून याला ऑस्कर 2021 मध्ये एंट्री मिळाली आहे. या लघुपटाला लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत स्थान मिळाले आहे. एकता कपूर आणि ताहिराने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्राम वर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ताहिराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिले आहे, ’93 अॅकेडमी अवॉर्डमध्ये लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीतील टॉपच्या 10 सिनेमात ‘बिट्टू’चे सिलेक्शन झाले आहे. इंडियन वुमन राइजिंगअंतर्गत आमचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. हा आमच्यासाठी खूपच विशेष क्षण आहे. करिश्मा तू खूप प्रगती कर. मित्रांनो कृपया या शॉर्ट फिल्मला सपोर्ट करीत राह. या कॅटेगरीत 174 लघुपट क्वालिफाइड झाले होते अशी माहितीही ताहिराने पोस्टमध्ये दिली आहे. तसेच टॉप 10 मध्ये आलेल्या सिनेमांची नावेही ताहिराने पोस्टमध्ये लिहिलेली आहेत.

एकता कपूरनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आनंद व्यक्त करीत तिच्या संपूर्ण टीमची प्रशंसा केली आहे. ‘बिट्टू’चे दिग्दर्शन विद्यार्थिनी असलेल्या करिश्मा देव दुबेने केल्याची माहितीही एकताने तिच्या पोस्टमध्ये दिली आहे. या सिनेमात रानी कुमारी, रुनू कुमारी, कृष्णा नेगी, मोनू उनियल आणि सलमा खातूम यांनी काम केलेले आहे. ऑस्करमध्ये एंट्री मिळवण्यापूर्वी ‘बिट्टू’ 18 फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलेला असून अनेक पुरस्कारही या सिनेमाला मिळालेले आहेत. करिश्माला बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कारही मिळालेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER