जळगाव पॅटर्न नाशिकमध्ये राबवणार; पुढचा महापौर शिवसेनेचा राहणार, संजय राऊतांचा दावा

Nashik Municipal Corporation - Shiv Sena - Sanjay Raut

मुंबई : भाजपच्या (BJP) ताब्यात असेलेली जळगाव (Jalgaon) पालिकेतील सत्ता शिवसेनेने (Shiv Sena) मिळवली आहे. भाजपच्या नाराज असलेल्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवून शिवसेनेने आपला महापौर निवडून आणला आहे. आता हाच पॅटर्न नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीतही राबवणार असून, नाशिक महापालिकेवरही (Nashik Municipal Corporation) शिवसेनेचा झेंडा फडकणार असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला. आज केंद्राने मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग केला. याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता हा दावा केला.

राऊत म्हणाले की, शहराला नेमंक काय हवंय, कोणत्या योजना हव्या याची माहिती माझ्याकडे आहे. सकाळी सहा वाजता त्यांनी शपथ घेतली, हा मग घोडेबाजार नव्हता का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला (BJP) केला. नाशिक शहराला नेमकं काय हवंय. काय योजना राबवता येतील. यासाठी शिवसेना योजना तयार होतेय. याबाबत सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी ही माहिती मुख्यमंत्र्यांना देणार, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरण आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) स्फोटकं प्रकरणांवर भाष्य केलं. एनआयएला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती. एनआयएला जो तपास करायचा आहे तो करु द्या. मुंबईचे पालीस, महाराष्ट्राचे एटीएस सक्षम आहे. मात्र, केंद्रात विरोधी सरकार आहे. विरोधी पक्षांची वेगळीच भूमिका आहे. त्यामुळे ते राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यातील सरकारला काहीही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले.

दिल्लीत भाजपचे हायकमांड आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते हायकमांडला मुजरा करायला गेले असतील. त्यामुळे यात काही नवे नाही. उद्या उद्धव ठाकरे जर देशाचे पंतप्रधान झाले, तर आम्हाला पण मुख्यमंत्र्यांना भेटायला जावे लागेल.

मुंबई पोलीस दल हे सक्षम आहे. पोलीस समर्थ आहेत. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सक्षम नवं नेतृत्व मिळालं आहे. अनिल देशमुख यांच्या बदलीचे सध्या चित्र दिसत नाहीये. शरद पवार यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी पुढे बोलताना राऊत यांनी कोरोनावर भाष्य केले. कोरोना राज्यभरात वाढत आहे. माझी शिवसेनेच्या नेत्य़ांशी, पालिकांच्या नेत्यांशीही चर्चा केली. नाशिकच्या कोरोनावाढीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. कारण राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत.

शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष सहभागी व्हावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं. आतापर्यंत सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात सक्रिय नाहीत. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये (UPA) नाही. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे सक्षम नेतृत्व आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER