जळगावात अखेर ‘सांगली पॅटर्न’ ; शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा

BJP-Shivsena

जळगाव :- भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमध्ये शिवसेनेने अखेर सांगली पॅटर्न (Sangali Pattern) यशस्वी करून दाखवले आहे. जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला असून 27 नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Khadse) आणि जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची घेणार भेट घेणार असून शिवसेनेला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

जळगाव महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेनं 27 नगरसेवक फोडून सुरूंग लावला आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी आणि राज्य भाजपचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्यावर आहे. पण आता महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे बहुमत संख्याबळ शिवसेनेने उध्वस्त केले .

जळगाव महापालिकेचे शिवसेनेने फोडलेले सर्व 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच गिरीष महाजनांचा राजकीय पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच दे धक्का देण्याची रणनीती शिवसेनेने आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राने संयम सोडला तर कानडी राज्यास आर्थिक किंमत मोजावी लागेल ; शिवसेनेचा  इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER