एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच ; स्थानिक नेते उत्सुक

Sharad Pawar & Eknath Khadse

जळगाव : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वातावरणात सुरू झाली आहे. आता एकनाथ खडसे यांचा एका ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात खुद्द खडसे यांनीच भाजप सोडण्याबद्दल भाष्य केले आहे. यावरून उत्तर महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादीला खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी आशा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे स्वागतच असल्याचे नेते म्हणाले.

पक्ष संघटनवाढीसाठी राष्ट्रवादी एकनाथ खडसेंना आश्रय देऊ शकते. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले तर त्यांचे स्वागतच आहे.

मात्र खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भय्या पाटील म्हणाले.नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत घेतले तर पक्षाला जळगावसह खानदेशात फायदा होऊ शकतो, अशी आशा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना असल्याचे बोलले जाते. खडसेंना प्रवेश दिल्यास पक्षाची स्थिती काय असेल, याबाबत जिल्ह्यातील नेत्यांकडून पवारांनी मते जाणून घेतली.आगामी काळात होणारी जिल्हा बँक, दूध संघाची निवडणूक, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला फायदा होऊ शकेल. एकनाथ खडसेंसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यास भाजपला खिंडार पडेल, असेही रवींद्र भय्या पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER