तुम्ही केलेली फोडाफोडी ‘भद्र’ आणि आमची युती अभद्र? शिवसेनेची भाजपवर टीका

Shivsena & BJP

मुंबई :- जळगाव महापालिकेत भाजपाच्या २७ नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याने सत्तांतर  होऊन शिवसेनेचा महापौर झाला आहे. या सत्तांतरामुळे जळगाव महापालिकेत भाजप व शिवसेनेत खडाजंगी सुरू आहे.

‘तुमचे नगरसेवक शिवसेनेत आले तर ती अभद्र युती आणि अडीच वर्षांपूर्वी तुम्ही दुसऱ्या पक्षातून नगरसेवक फोडून सत्ता आणली ती भद्र युती होती का? असा सवाल करत, जळगाव महापालिका शिवसेनेचे अनंत जोशी यांनी भाजप आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.

भाजप आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन फुटीर नगरसेवकांसह शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर  आज शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार भोळे यांच्या आरोपांना उत्तरे दिलीत.

आमदार भोळे यांनी पत्रकार परिषदेत ‘गरीब की बीवी सबकी भाभी’ या म्हणीचा वापर करून गरिबांचा व महिलांचा अपमान केला आहे. त्यांचा मी निषेध करतो. आमदार भोळे यांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत. त्यांच्यासोबत भाजपमध्ये असलेले आजही अनेक जण दुसऱ्या पक्षांमध्ये फिरून आले आहेत. त्यांचे चार नगरसेवक तर घरकुल घोटाळ्यात दोषी असल्याने नैतिकता दाखवून आमदारांनी त्यांचे राजीनामे घ्यावेत, असे जोशी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : कितीही झाकले  तरी सत्य लपणार नाही! “ये पब्लिक है, ये सब जानती है! ; भाजप नेत्याचा शरद पवारांना टोला 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER